राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता

पुणे – मागील काही दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे, तर राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भ या भागात ढगाळ वातावरण आहे. तर आता पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तर मागील काही  दिवसापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक भागांत चटका वाढला आहे. मात्र आता राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर राज्यातील काही भागात अधूनमधून ऊन पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया , सातारा , सांगली , सोलापूर, हिंगोली , लातूर ,उस्मानाबाद, गर, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –