मुंबई – हवामान विभागाकडून ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान देशात 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो आहे.
मात्र, पुढील दोन महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काल भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. पण पुढील दोन महिन्यांचा एकत्रित विचार केला असता, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
- आता नवीन स्वरुपात सातबारा; जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाहीत
- राज्यातील ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध राहणार लागू
- उपाशीपोटी पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
- जाणून घ्या, केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे….
- राज्यातील ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम