राज्यातील ‘या’ भागात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

पुणे – राज्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गेले दोन ते तीन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा हाच मूड पुढच्या तीन ते चार दिवस असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ७ ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ही माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात यापुर्वी झालेल्या पावसाची झालेल्या पावसात अनेक ठिकाणी शेतीचे, नुकसान झाले तसेच पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

7 आणि 8 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह अनेकठिकाणी उद्यासाठी यलो अलर्ट आहे तर उद्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस ह्या भागात बघायला मिळू शकतो. मुंबईत देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –