सध्या बंगालच्या उपसागरामध्ये मंदोस (Cyclone Mandous) नावाचे चक्रीवादळ धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे तमिळनाडूतील काही भागात सोसाट्याचे वारे वाहणार असून जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 85 किमी वेगाने वाहणारे हे वारे असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. चक्रीवादळामध्ये खळखळणारा समुद्र हळूहळू रौद्ररूप धारण करताना दिसत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात शुकशुकाट पसरलेला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही होऊ शकतो. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोकण आणि परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तमिळनाडूमध्ये सक्रिय झालेले हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर देखील प्रभाव पडणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर पर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी चक्रीवादळामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये देखील या वादळाचा थोडा परिणाम दिसून येणार आहे. यावर्षी हिवाळ्यामध्ये पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे, या वर्षीही हिवसाळा चुकलेला नाही अशी प्रतिक्रिया सामान्यजन देत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, 9 ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गोवा आणि कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पाऊस चांगलाच धुमाकूळ घालू शकतो. तर विदर्भातही ऐन हिवाळ्यात पाऊस अनुभवायला मिळू शकतो. या चक्रीवादळामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
तमिळनाडूमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. तर, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला असून, गरज असल्यास बाहेर पडा असे आवाहन देखील शासनाकडून करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक
- हिवाळ्यात अंडे का खावे? जाणून घ्या काय आहेत फायदे…..
- हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार, घ्या जाणून……
- जाणून घ्या; पाणी कसं आणि केव्हा प्यावं?