पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई – मुसळधार पावसाने कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून रायगडमधील सावित्री आणि आंबा नद्यांना पूर आला आहे. काळ नदीने पाणीही वेगाने वाढत आहे. पालघरच्या शहरी भागात पाण्याचा निचरा होत नसतानाच जव्हारसारख्या डोंगरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. असे चित्र अनेक भागात असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तर पुढील पाच दिवस राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. तर 30 आणि 31 जुलै रोजी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. शिवाय रायगड, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई आणि उपनगरात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –