उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

पावसाची शक्यता

पुणे – महाराष्ट्रातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे . पुढील काही दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत  जोरदार पावसाची शक्यता असल्याच हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितल आहे.

मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात पाऊस झाल्याने कमाल तापमानाचा पारा झपाट्याने खाली होता. तर शनिवारी पश्‍चिम महाराष्ट्रात सकाळपासून अंशतः मळभ दाटले होते. त्यामुळे राज्यातील वातावरणातील उकाडा चांगलाच कमी झाला होता. तर शनिवारी (ता. २२) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याच हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितल.

तर उद्या महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याच हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितल आहे.

महत्वाच्या बातम्या –