राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई – मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून मुंबईत जोरदार बॅटिंग करत असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

मुंबईत मागील 4-5 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईत आज आणि उद्या म्हणजेच 13 आणि 14 जूनला मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसोबतच राज्यात आज – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि उद्या – संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –