राज्यात पुढील ४ दिवस अतिमुसळधार पाऊस; तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज ॲलर्ट जारी

पाऊस

पुणे – भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागनं राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केले आहेत. हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. रत्नागिरीमध्येही मंगळवार ते गुरुवार या कालावधीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा येथे घाट परिसरात आजपासून तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे जिल्ह्यामध्ये घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. या भागामध्ये फारसा पाऊस नसेल, असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातही  मंगळवारी पावसाचे प्रमाण काहीसे नियंत्रणात असू शकेल. सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही फारसा पाऊस नसेल. औरंगाबादमध्ये गुरुवारी, जालन्यामध्ये बुधवार-गुरुवारी, तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये सोमवार ते बुधवार या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.

विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एखाद-दुसऱ्या जिल्ह्यात गुरुवारपर्यंत मंगळवार-बुधवारी तुरळक ठिकाणी पावसाचा वेग थोडा वाढू शकेल. मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये इतर दिवशी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –