जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

पाऊस

सिंधुदुर्गनगरी –  जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री झाली असून हा मुसळधार पाऊस सुरूच आहे. पाऊस सुरूच असल्यामुळे नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील बहुतांशी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील वैभववाडी , कणकवली तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. तर वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शुक, शांती, करूळ, कुसूर, अरूणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील शुकनदीला पूर आला आहे. तर शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खारेपाटण शहरात पूरसदृश स्थिती आहे. खारेपाटण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महत्वाच्या बातम्या –