विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

मुसळधार पाऊस

मान्सूनने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. तर येत्या 2 आणि 3 जुलैला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. तर मुंबईसह उपनगरात आजही रिमझीम पाऊस आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात जराही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला अद्याप दिलासा मिळालेला नाही. मात्र या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच येत्या 2 आणि 3 जुलैला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसापासून मुंबई, पुणे, नाशिक, कोकण या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. कोल्हापूरातील राजाराम, शिंगणापूर, रुई, सुर्वे, इचलकरंजी हे कमी उंचीचे पाच बंधारे मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

शेतीत वाढतोय आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर

धक्कादायक आरोप ; खतात राख मिसळली जातेय – कृषीमंत्री