‘या’ जिल्ह्यात पावसाने लावली जोरदार हजेरी

रत्नागिरी – मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून उत्तरेकडे वाटचाल केली आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

त्यात रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार अतिवृष्टी नाही, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यांत सर्वाधिक पाऊस पडला. रविवारीही जोरदार पाऊस सुरू होता. रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी सरासरी ५४.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात १०४.६० मिमी पाऊस नोंदला गेला आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –