‘या’ जिल्ह्यामध्ये 28 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस

पाऊस

मुंबई – पावसामुळे निर्माण होणार्‍या अडचणी मुंबईकरांसाठी मोठ्या प्रमाणात वाढतच आहे, मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये झालेल्या मोठ्या पवासाने 26 वर्षांचा विक्रम मोडला आहे. हवामान विभागाच्या आकड्यांनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये इतका पाऊस 26 वर्षानंतर झाला आहे. दोन दिवस झालेल्या या पावसाने मुंबईची अवस्था अतिशय वाईटझाली होती. आता मुंबईकर त्या अडचणीतून बाहेर पडत होते तोवर, 28 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने सांगितले की, सध्या मुंबईमध्ये पाऊस बंद आहे. पण 28 सप्टेंबरपासून पुन्हा मान्सूनच्या परतीची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने गु़रुवारी आपले दीर्घकालिन वर्षा पुर्वानुमान जाहीर केले. ज्यानुसार राजस्थान च्या उत्तर पश्‍चिमी भागात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या आठवड्या दरम्यान कमी पाऊस होतो आणि आठवड्याच्या मध्यात दक्षिण पश्‍चिम मान्सून च्या परतीची यात्रा सुरु होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, 17 सप्टेंबर ही पावसाच्या परतीची तारीख मानली जाते. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आगामी आठवड्यामध्ये 2 ते 8 ऑक्टोबर पर्यंत, विदर्भातील काही भागात पाऊस होणार नाही. परतीचा पाऊस साधारणपणे पावसाच्या सुरुवातीनंतर 15 दिवसांच्या आत पूर्ण होतो.

परतीचा पाऊस राजस्थान ची हवा दक्षिण पश्‍चिम ऐवजी पूर्वेकडून वाहू लागते तेव्हा सुरु होतो. हा पाऊस राजस्थानमधून सुरु होतो. पूर्वेच्या हवेची दिशा रिटर्न पावसाची रेषा आहे. या रेषेच्या वर उत्तर मध्ये पाऊस थांबतो आणि दक्षिणेत सुरु होतो.

महत्वाच्या बातम्या –