राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पाऊस

पाऊस

पुणे – परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. त्यामुळे रब्बी पेरणीची कामे खोळंबत असल्याची स्थिती आहे.

विदर्भात पुन्हा पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. विदर्भातील भंडारा जिल्हा वगळता अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला. काही भागात अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यातच खरिपातील विविध पिके काढणीस आल्याने पावसामुळे काढणी खोळंबली आहे.

मध्य महाराष्ट्र व कोकणात ढगाळ हवामान आहे. मात्र, तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे सकाळी धुके पडत आहे. कोकणात चिपळूण, खेड, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी कमी पाऊस पडला. मराठवाड्यातही औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या.

विदर्भातील अनेक भागांत हलका पाऊस झाला. बाळापूर, पातूर, चांदूरबाजार, लोणार, चंद्रपूर, गोरेगाव, रामटेक, सावनेर, सेलूर, रिसोड, वणी येथे मुसळधार पावसान हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बीची पूर्व तयारीची कामे रखडल्याची स्थिती आहे.

शुक्रवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)कोकण : खेड १०. मध्य महाराष्ट्र : अकोले ८, निफाड १७.८. विदर्भ : बाळापूर ११.५, पातूर १२.२, चांदूरबाजार १५.६, लोणार ११.३, चंद्रपूर १९.४, गोरेगाव १६.९, रामटेक १०.६, सावनेर १२.९, सेलू १४.२, रिसोड ३०.२, वणी १६.५.

महत्वाच्या बातम्या –