जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने लावली जोरदार हजेरी

पाऊस

मुंबई –  गेल्या महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍लर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे.

कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसामुळे कांदिवली परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –