सिंधुदुर्गनगरी – ‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी तालुक्यात 365 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वैभववाडी तालुक्यात 149 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी 218 पूर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग – 250, सावंतवाडी – 265, वेंगुर्ला – 180, कुडाळ – 203, मालवण – 210, कणकवली – 192, देवगड – 199 आणि वैभववाडी – 149 या प्रमाणे पाऊस झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट
- राज्यात तब्बल ५९ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात तर रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ
- पेट्रोल, डिझेल सोबतच आता खतांच्या दरात वाढ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय – जयंत पाटील
- ‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे
- तोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने ‘या’ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान