राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाने लावली जोरदार हजेरी

राज्यातील

परभणी: सध्या वातावरणात अनेक बदल बघायला मिळत आहेत. तौक्ते वादळाच्यावेळेस पावसाने राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती तसेच आता पूर्वे कडील ‘यास’ हे वादळ तयार झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पावसाने काही ठिकाणी हजेरी लावायला सुरु केली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी रात्री वादळी वाऱ्यासह शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. याचबरोबर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या नंतर वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.

शहरासह तालुक्यातील सर्वच ठिकाणी गुरूवारी रात्री पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरातीन विविध भागांसह ग्रामीण भागात गुरूवारी रात्री अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत परभणी शहर व परिसरात ३.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सदर पाऊस हा मान्सुनपूर्व पाऊस असून योग्य पाऊस पडल्यानंतरच शेतीच्या कामांना प्रारंभ करण्यात यावा असा सल्ला हवानाम विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस म्हणजेच रविवार पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून पावसाची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आल्याची माहिती येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक २ ते ८ जून दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –