राज्यातील ‘या’ जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले

पाऊस

सिंधुदुर्ग – राज्यात मागील काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. दरम्यान मागील आठवड्यापासूनच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच आहे.

जिल्ह्याला (दि १४ जुन) रोजी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरूच आहे. तसेच दि १५ जुन रोजी पण पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील उर्वरित सवांवाडी, कणकवली आणि देवगड या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच या तालुक्यांमध्ये १३० मि.मी  अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने सगळी कडे पाणीच पाणी झालं होत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यामुळे बांदा शहरात पाणीच पाणी झालं होते त्यामुळे काही दुकानात पाणी शिरले होते. तर जिल्ह्यात काही ठिकणी शेतीत पाणी गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कुडाळ तालुक्यातील होडावडे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

महत्वाच्या बातम्या –