राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले

पाऊस

 नांदेड – राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या होत्या. जून महिन्याच्या प्रारंभी दाखल झालेल्या मान्सूनने बराच काळ विश्रांती घेतली. त्यानंतर 8 जुलै पासून मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. तर आता  राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला काल पावसानं झोडपून काढलं. नांदेड, औरंगाबाद, परभणी, अकोला, वाशिम, सांगली, नाशिक आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. या जिल्ह्यांतील अनेक भाग जलमय झाले तर पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला.

राज्यातील हिंगोली जिल्ह्यात 2 प्रवाशांसह एका मोटर पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काशीद गावाजवळील जुना पूल कोसळून चारचाकी आणि दुचाकी वाहून गेली. दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात 153 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यातील सरपंचनगर, अंकुरनगर, भावसार चौक, तरोडा खुर्द नांदेड ईथ पावसाचे पाणी रस्त्यावर, घरांमध्ये साचले आहे. या भागातील नागरिकांची दाणादाण उडाली. शहरातील तरोडा खुर्द भागातनेते नागोराव इंगोले मालेगावकर यांनी अन्न उपलब्ध करून दिले. तर काही कुटूंबांची थांबण्याची व्यवस्था केली.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात देखील रविवार दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यानं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कणकवलीतील खारेपाटण इथं सुख नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं खारेपाटणच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटरस्त्याचा काही भाग खचल्यानं या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या –