राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाने लावली जोरदार हजेरी

पाऊस

औरंगाबाद – जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे असे दिसत आहे.  शनिवारी सर्वत्र चांगला पाऊस झाला. आभाळाकडे नजर लाऊन बसलेल्या शेतकाऱ्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत आणि आता पेरणीच्या कामाला सर्व शेतकरी जोमाने लागतील. मृग नक्षत्रातील पावसाने मारठवड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलीच हजेरी लावली. मृग नक्षत्र सुरू होऊन तीन दिवस झाले तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यात निरूत्साही वातावरण दिसत होते.

औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, व इतर अनेक भागांमध्ये शनिवारी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका व मध्यम तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी नुसते थंडगार वारे वाहत असल्याने पाऊस पडण्याची चिन्ह दिसत होती. उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात सायंकाळी उशिरापर्यंत हलक्या व मध्यम स्वरूपाची बरसात सुरू होती.

या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ज्या ठिकाणी चांगला पाऊस पडला त्या ठिकाणी खरीप पेरणीच्या कामास आता वेग येणार आहे. पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तुळजापूर तालुक्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे काही नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचले आहे. गावातील एका जनरल स्टोअर्समध्ये पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान देखील झाले असल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या –