राज्यात ‘या’ तारखेपासून सुरू होणार मुसळधार पाऊस

पाऊस

पुणे –  राज्यात (दि.२८ सप्टें) मुसळधार पाऊस सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या पश्चिम राजस्थान आणि आसपासच्या भागातून नैऋत्य मान्सून परत फिरण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

यंदा १७ मे पासून मान्सूनचा प्रवास सुरू झालेला प्रवास फारसा न अडखळता वेगाने सरकत राहिला होता. केरळमध्ये १ जूनला दाखल झाल्यानतंर महाराष्ट्रात साधारपणे ११ जूनच्या दरम्यान मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर मराठवाड्यातील दक्षिण भागातून उत्तरेकडे सरकून प्रवास वेगाने सुरू झाला होता.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात संपूर्ण मान्सून व्यापल्यानंतर १४ जूननंतर उत्तरेकडे कूच केली होती. अवघ्या १० दिवसांत मान्सूनने संपूर्ण देश व्यापून बारा दिवस आधीच म्हणजेच भारताच्या वायव्य भागात २४ ते २५ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता.

या दरम्यान राज्यासह, देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला होता. गेले चार महिने देशातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवार
(दि.२६) देशात ९४५.७ मिलिमीटर म्हणजेच १०९ टक्के पावसाची नोंद झाली होती अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामध्ये जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, ईशान्य भारतातील नागालॅन्ड, मनिपूर, मिझोराम, या राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. आता मान्सूनचा परतीचा प्रवास जोरदार सुरू होणार आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे..

साधारपणपणे एक सप्टेंबरच्या दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळपत्रकानुसार १७ सप्टेबर  रोजी मान्सून परतीचा प्रवास सुरू होणे अपेक्षित होते. त्यामुळे काही प्रमाणात हा प्रवास लांबल्याची स्थिती असून दहा ते बारा दिवस उलटूनही वारे फिरले नव्हते. आता राजस्थानात पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचबरोबर राज्यातही गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने विश्रांती देण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, सध्या पूर्व-पश्चिम राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि काश्मिर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या भागात पावसाची  उघडीप दिली असून उन्हाचा चटका वाढला होता. यामुळे पश्चिम राजस्थानमधील अजमेर येथे सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती हवामान खात्याच्या सुत्रांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –