राज्यतील ‘या’ भागात जोरदार पाऊस सुरूच राहणार

पाऊस

मुंबई – राज्यात संततधार कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने दिली आहे. तर २४ व २५ तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. त्यामुळे आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातही संततधार सुरुच राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –