पुढील काही दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार जोरदार पाऊस

पुणे – मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. तर  कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर राज्यात आज कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली , मराठवाडा या भागात पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

तर मागील काही दिवसापासून कोकणातील अनेक भागात पाऊस पडत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर राज्यात काही भागात अधूनमधून ऊन पडत आहे. तर अशी  स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर राज्यात कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, वाशीम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा, परभणी, हिंगोली, अकोला जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान विभागाने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या –