मुंबई – राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत राज्यातील कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
तर राज्यात आज (२९ जुलै) रोजी ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मुसळधार पावसाने अगोदरच धुमाकूळ घातला आहे. या ठिकाणी दरड दुर्घटनेत अनेकांचे जीव गेले आहेत. आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवल्याने या जिल्ह्यांच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे कळते. याबाबत हवामानाची अधिक माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी समाज माध्यमावर दिली आहे.
एकीकडे पश्चिम महाराष्ट्रावर पावसाचे अवकाळी संकट आहे. तर मराठवाड्यात अजूनही जेमतेम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : दि. २८ जुलै २०२१
- राज्याची चिंता वाढली; जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची झाली वाढ
- राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस
- शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये
- साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या