राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस

पुणे – राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.   तर आता हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे, राज्यात आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात होणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यातील कोकण आणि विदर्भात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक भागात पाऊस पडणार आहे. त्याच बरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार आहे..

तर आज (दि ८ जुलै) राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –