राज्यात ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

पाऊस

मुंबई – सध्या पावसाने जोरदार आगमन केल्याने मुंबई, कोल्हापूर आणि राज्यात अशा अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. काही ठिकाणी तर  पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आता पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी

आज पासून ते १३ ऑगस्ट पर्यंत विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील प्रामुख्याने घाटक्षेत्रात पडण्याची शक्यता आहे.

पुन्हा ‘या’ जिल्ह्यातील ५ शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊन

दरम्यान मुंबई आणि उपनगर भागात होत असलेल्या सततच्या आणि बेभरोसी पावसामुळे ‘घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच घरा बाहेर पडा’ असा ईशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा तसेच समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहाण्याचेही सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –

पालक खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या