राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई –  राज्यात महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. तर राज्यातील मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती.  तर   भागांमध्ये पुढील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यातील परभणी, बीड, लातूर आणि नांदेड  जिल्ह्यांमध्ये उद्या ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

तर राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांमध्ये ३ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर ४ ऑक्टोबर औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास ०६ ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –