राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान वभागने वर्तविली आहे. तर राज्यात 29, 30 नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची व जोरदार वाऱ्यांची शक्यता. काही ठिकाणी हलका पाऊस. पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान वभागने वर्तविली आहे. तर यामध्ये राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे.

 

तर २९  नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी राज्यातील  सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी , रायगड, पुणे, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर 30 नोव्हेंबरला राज्यातील   सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक , ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, अहमदगर या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी केला आहे.

सोमवारी  २९  नोव्हेंबरला राज्यातील ठाणे, मुंबई आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंगळवारी सोलापूर, औरंगाबाद आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –