Share

चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय

Published On: 

🕒 1 min read

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ही अवस्था जरी कुणाला आवडत नसेल तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. मात्र योग्य वेळी काही उपाययोजना केली तर या समस्येपासून काही प्रमाणात समाधान मिळू शकते.

मात्र, आता तुम्ही कोणतीही चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही फायदेशीर उपचार सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा अधिसारखी सुंदर होईल……

  • अर्धा चमचा दुधावरची साय घेऊन त्यात १०-१२ थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चांगल एकत्र करून घ्या व रोज रात्री झोपतांना चेहऱ्यावर लेप करा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर लेप करण्यापुर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
  • कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा लवकर सुरकुत्या पडू नये यासाठी चेहऱ्याचा नियमित मसाज करणे खूप फायद्याचे ठरते. अनेकांना प्रश्न पडेल की मसाज कसला करावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी तेलाचा मसाज खूप उपयोगी आहे. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार वेगवेगळे तेल वापरू शकता.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे चंदन. याचा लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. यातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणारी बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात. याच्या लेपनामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी कमी करण्यास मदत करतात.
महत्वाच्या बातम्या – 

बातम्या (Main News) आरोग्य विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या