भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

तुम्ही भाजलेले चणे खाल्लेच असतील. केवळ स्वाद म्हणून तुम्ही जर चणे खात असाल तर दररोज चणे खाण्यास सुरुवात करा. कारण हे चणे खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आर्यन आणि व्हिटामिन असते. चला तर जाणून घेऊ फायदे…..

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार

  • भाजलेले चणे खाल्ल्याने युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात. ज्यांना सतत लघवीला होत असेल त्यांनी चणे आणि गूळ खावे. काही दिवसांतच आराम पडेल.
  • पाचनशक्ती वाढवण्यासाठी दररोज चण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे रक्त शुद्ध होते. तसेच त्वचा उजळते. चण्यामध्ये फॉस्फरस असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते
  • भाजलेले चणे मधासोबत खाल्ल्याने नपुसंकता दूर होते. एखाद्या पुरुषाचे वीर्य पातळ असेल तर चणे खाल्ल्याने फायदा होतो.

कर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

  • भाजलेले चणे खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा मिळतो. भाजलेले चणे ग्लुकोजची मात्र कमी करतात. डायबिटीजच्या रुग्णांनी नियमितपणे चणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
  • दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी ५० ग्रॅम भाजलेले चणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढल्याने अनेक आजारांपासून रक्षण होते. तसेच ऋतू बदल झाल्याने शारिरीक समस्याही दूर होतात.

महत्वाच्या बातम्या –

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी