‘शेपू’ची भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे , जाणून घ्या

काहीशा चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात. या भाजीची लागवड भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या आणि उबदार वातावरणात होते. या भाजीची उंची साधारण एक मीटपर्यंत वाढते. या भाजीचा वापर भारताप्रमाणेच रशिया, युक्रेन, पोलंड यांसारख्या देशांतही केला जातो. दिसायला हिरवीगार असल्याने कोथिंबिरीच्या गटात मोडते.

मात्र हिची चव कोथिंबिरीप्रमाणे नसते तर हिला एक विशिष्ट उग्र चव असते. चवीला चांगली नसली तरी हिच्यात भरपूर औषधी गुण आहेत. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • शेपूच्या बियांमध्ये आढळणारे तेल अनेक आजारांवर फायदेशीर आहे.  मधूमेहींसाठी ‘शेपू’ फारच  उपयुक्त आहे. रक्तातील साखरेचे सतत वर-खाली होणारे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. तसेच यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीचे कार्यदेखील सुधारते.
  • शेपूच्या भाजीतील पोषक घटकांमुळे ब्लड शुगर सोबतच  कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. परिणामी हृदयाचे कार्य सुधारते. त्यामुळे नैसर्गिकरित्या घातक कोलेस्टेरॉईलचे प्रमाण कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉईलचे प्रमाण वाढवतात.
  • असंतुलित हार्मोन्समुळे  अनेक  स्त्रियांमध्ये अनियमित मासिकपाळीची समस्या असते. मात्र शेपूतील पोषक घटक हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. तसेच स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता सुधारण्यास मदत करतात.
  • शेपूच्या भाजीमधील Polyacetylenes घटक हे अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि दाहशामक असतात. पूर्वीच्या काळी संसर्गापासून बचाव करण्यासाठी जखमेवर शेपूच्या बीया लावल्या जात असे. तसेच शेपूमुळे मायक्रोबायलची वाढ रोखण्यास मदत होते तसेच शरीरातील फ्री- रॅडीकल्सची निर्मिती व प्रभाव कमी करण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.
  • शेपूची भाजी रेचक,पचायला हलकी असल्याने त्यामुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा व स्वच्छ राहण्यास मदत होते. शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास  मदत होते असे काही संशोधनातून समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या –