सब्जा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. सब्जा हा सुपरफूड प्रमाणे असते. यात चार ग्रॅमपर्यंत प्रोटीन, ९ ग्रॅम चांगलं फॅट ज्यात ५ ओमेगा-३ एस असतात. जवळपास १८ टक्के कॅल्शियम आणि ३० टक्के मॅग्नेशिअम असतं. यात झिंक, व्हिटामिन बी ३ (नियासिन) , पोटॅशिअम, व्हिटामिन बी १ (थायमिन) आणि व्हिटामिन बी-२ आणि व्हिटामिन ईचं चांगलं प्रमाण असतं. एक चमचा सब्जाचं बी शरीरात बरेच सकारात्मक बदल आणतात. पण हे घेण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊ फायदे….

  • प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
  • मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते. सब्जाच्या सेवन केल्याने खाल्यानंतर पोटात अॅसिडिसी कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्या कमी होतात. तसेच शरीराला एनर्जीही मिळते.
  • बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.
  • प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.
  • सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –