हिरवे वाटाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

बाजारामध्ये हिरव्या वाटाण्यांची आवाक् पाहायला मिळते. वाटाण्यांचा फक्त भाजीतच नाही तर पुलाव, पोहे, पराठे, पुऱ्या यांसारख्या इतर अनेक पदार्थांमध्येही वाटाण्याचा समावेश करण्यात येतो. वाटाणा आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. एवढचं नाहीतर आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही वाटाणे खाणं फायदेशीर ठरतं. चला तर मग जाणून घ्या फायदे….

देशातल्या 5 बँकांत मोठी भरती, अर्ज करून मिळवा नोकरी

  • जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज मुठभर वाटाणे नक्की खा. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. जे भूक नियंत्रणात ठेवण्यासोबतच फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.
  • वाटाण्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आढळून येतं. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे डायबिटीसपासून सुटका होण्यास मदत होते.
  • सर्व आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत असणारा वाटाणा शरीराची रोगप्रितिका शक्ती वाढविण्यासाठीही मदत करतो. यामुळे आजारांपासून लढण्यासाठी शरीराला ताकद मिळते. त्याचरोबर हे अन्न पचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिवाणुंना अॅक्टिव ठेवतात. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीही मदत करते.

धन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

  • अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टी इंफ्लेमेटरी मुबलक प्रमाणात असल्यामुळे याचं सेवन शरीरात कॅन्सर सेल्स वाढविण्यापासून थांबवतात. यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करू शकता.
  • वाटाण्यामध्ये असलेलं प्रोटीन हाडांच्या मजबुतीसाठी मदत करतं. ज्यामुळे वाढत्या वयात होणाऱ्या ओस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो.
  • हिरवा वाटाणा खाल्याने स्मरणशक्ती वाढते. याव्यतिरिक्त तणाव, डिप्रेशन यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. शक्य असल्यास तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता.

महत्वाच्या बातम्या –

मोठी नोकर भरती; थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी

राज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही