सर्दीसाठी एकदा करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय!

हवामान बदलल्यामुळे अनेकवेळा आपल्याला सर्दी (Winter) , खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतो. काही जणांना थंडीमुळे त्रास होतो. हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर सायनस असणाऱ्यांना तर जास्त त्रास होतो. सर्दी (Winter)  होते आणि डोकही कायम दुखत राहातं.  डोकेदुखी, चेहऱ्याला सूज येणं, सर्दी होणे अशा समस्या उद्भवतात. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच पण काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतो.

  • सर्दी (Winter)  झाली असेल तर काबुली चणे आणि चुरमुरे खावेत त्यावर पाणी पिऊ नये म्हणजे सर्दी लवकर बरी होते.
  • सुंठ उगाळून डोक्याला लावली तरीही सर्दी (Winter) कमी होण्यास मदत होते.
  • हळद आणि मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यामुळे कफ कमी होतो. शक्य असेल तर हळद घालून कोमट पाणी घ्यावं.
  • वेलची खाल्ल्यानं किंवा वेलचिचं पाणी घेतल्यामुळे सर्दीवर आराम मिळतो.
  • आल्याचा रस लिंबू आणि गूळ एकत्र करून घ्यावा. याचे सेवन दिवसातून तीन वेळा केल्यास सर्दी खोकल्यावर आराम मिळतो.
  • सर्दीसाठी वापरलेला रुमाल गरम पाण्यात भीजवावा त्यामुळे जंतू निघून जातात. अन्यथा पुन्हा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
  • शक्य असेल आणि झेपल्यास निलगिरीचं तेल कापसाला लावून त्याचा वास घ्यावा त्यामुळे सर्दी (Winter) बरी होते.

महत्वाच्या बातम्या –