टीम महाराष्ट्र देशा: पूर्वी उच्च रक्तदाब (High Blood Pressure BP) ही समस्या वृद्धांचा आजार म्हणून ओळखली जात होती. परंतु ही समस्या आता अगदी सामान्य झाली आहे. उच्च रक्तदाबाची समस्या आजकाल आपल्याला लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बघायला मिळते. कारण बदलती जीवनशैली आणि अनियमित खाण्यापिण्याचे सवयीमुळे ही समस्या सर्वांमध्ये वाढत चालली आहे. उच्च रक्तदाब हा शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. कारण यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे निरोगी हृदयासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी मिठाचे कमी प्रमाणात सेवन करावे. त्याचबरोबर शक्य असल्यास मीठ पूर्णपणे सोडावे. तुम्ही जर चहा कॉफीची शकेल असाल आणि त्याचबरोबर उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर चहा, कॉफीचे सेवन तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
आरोग्य तज्ञांच्या मते, उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी डार्क चॉकलेट खूप उपयुक्त असते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्हनॉल असतात. हे फ्लेव्हनॉल रक्तवाहिन्यांना आराम देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन केले तर तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
मद्यपान केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते. त्याचबरोबर तुम्ही जर रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही मद्यपनापासून दूर राहिले पाहिजे. कारण मद्यपानाच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या अधिक तीव्र होऊ शकते.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण एकाच जागी बराच वेळ बसल्याने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते. त्यामुळे जर तुम्ही बसून काम करत असाल तर कामादरम्यान किमान 30 मिनिटांमध्ये एक ब्रेक घेऊन शरीराच्या हालचाली करा.
शरीराला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी प्या, असे आरोग्य तज्ञ आपल्याला नेहमी सल्ले देत असतात. त्याचबरोबर दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिल्याने रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ | दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये संजू सॅमसनला का नाही मिळाले स्थान?, कर्णधार शिखर धवनने सांगितले कारण
- Job Alert | अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय नौदलात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- BJP | “उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”, या भाजप खासदाराचा टोला
- Sachin Ahir | “कोणाचं मानसिक आणि राजकीय संतुलन बिघडलं…”, सचिन अहिर यांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
- Sushma Andhare | सुषमा अंधारेंनी शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या…