High Blood Pressure | हिवाळ्यामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

High Blood Pressure | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या ही खूप सामान्य झाली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे ही समस्या फक्त वृद्धांमध्ये नाही, तर तरुणांमध्ये देखील निर्माण होत आहे. उच्च रक्तदाबाची समस्या हिवाळ्यामध्ये वाढत जाते. थंडीमुळे हिवाळ्यात रक्तवाहिन्यांवर तणाव पडल्याने रक्तदाब वाढतो. त्याचबरोबर बदलता आहार, शारीरिक श्रम आणि हिवाळ्यात वजन वाढीमुळे देखील हाय बीपीचा त्रास व्हायला लागतो. उच्च रक्तदाबाची समस्या वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

लसूण

लसूण फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठी नाही, तर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर लसणाचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. लसुन खाल्ल्याने रक्त शुद्ध होऊन उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते. कारण लसणामध्ये सल्फरचे काही कंपाउंड आढळतात. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. नियमित सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते.

मेथी

मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते. जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर मेथीचे नियमित सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. मेथीच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे तुम्ही जर उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात मेथी दाणे किंवा मेथीच्या पानांचा समावेश केला पाहिजे.

अश्वगंधा

अश्वगंधा ही एक रामबाण आयुर्वेदिक औषधी आहे. आयुर्वेदामध्ये अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. त्याचबरोबर तुम्ही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अश्वगंधाचा वापर करू शकतात. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल, तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा अश्वगंधा पावडर एक ग्लास पाण्यासोबत घेतली पाहिजे. नियमित अश्वगंधाचे सेवन केल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या