सांगलीत हळदीच्या प्रतिक्विंटलला 17 हजार रुपयांचा उच्चांकी भाव

सांगलीमध्ये नवीन हळद काढणीला सुरुवात झाली आहे. व्यापारी आणि हमालांमध्ये सुरु आलेल्या वादातून हे सौदे लांबले होते. अखेर नवीन हळदीच्या सौद्यांना मुहुर्तावर सुरुवात झाली त्यानंतर शेतकरी राजेंद्र शिनगारे यांच्या हळदीला क्विंटलला 17 हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. पहिल्याच दिवशी 11 हजार 500 पोत्यांची विक्री झाली. या वर्षीच्या नवीन राजापुरी हळदीच्या सौद्यांना बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली.

पश्चिम वऱ्हाडातिला रेशीम पोहोचले कर्नाटकात(

राजापुरी हळदीला 8500 ते 17 हजार रुपये क्विंटल तर लगडी सेलमचा दर 12 हजार 700 रुपये राहिला. गेल्या वर्षी क्विंट्टलला कडापाला सरासरी साडेसात हजाराचा दर मिळाला होता. सांगलीची हळद पेठ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेश, बेळगाव, विजापूरसह शेजारच्या सीमा भागातील हळद सांगली बाजार समितीकडे विक्रीसाठी येते. डिसेंबर महिन्यांपासून हळद काढणीला सुरुवात होते. जानेवारीच्या पंधरावड्यात बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना सुरुवात केली जाते. नव्या हळदीच्या सुरुवातीला मुहूर्ताने सौदे काढण्यात आले.