नवी दिल्ली – युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कहर सुरू झाला आहे. भारतात देखील पुन्हा एकदा कोरोनाचा धोका बाधू लागला आहे. पुन्हा लॉकडाऊन होईल अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. तसेच घरी जाऊन आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत.
कंटेनमेन्ट झोनमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलेले आहे.
भारतात योग्यवेळी उपाययोजना केल्यामुळे कोरोना साथीने खूप मोठे नुकसान झालेले नाही. हे मिळालेले यश यापुढेही कायम राहील अशी दक्षता घ्यायची आहे, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना बजावले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
- पुढील 24 तासांत ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
- कोरोना रुग्ण संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला – उद्धव ठाकरे