‘हे’ घरगुती उपाय केल्याने ५ मिनिटांत दूर होईल सर्दी,खोकला

अनेकजण सर्दी-खोकला झाला की लगेच डॉक्टरकडे धाव घेतात आणि अॅलोपॅथीची औषधं घेतात. मात्र, त्याच्या दुष्परिणामांचा अजिबात विचार केला जात नाही. सर्दी-खोकला हा त्या मानाने अगदी सामान्य आजार असून, त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने घरगुती उपाय करणे अधिक चांगलं असतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
  • मोहरीच्या तेलामध्ये 4-5 पाकळ्या लसून टाकून ते गरम करून घ्या. ते कोमट झाल्यानंतर पायाच्या तळव्यांवर आणि छातीवर लावून मालिश करावी.
  • गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.
  • लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.
  • जवस आणि तीळ सम प्रमाणात भाजून घ्यावे. त्याची पूड तयार करून सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यात एक चमचाभर टाकून ते पिल्याने लगेच आराम मिळतो.
  • खोकला दूर करण्यासाठी एक कप पाण्यात एक आल्याचा तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि 4-5 काळे मिरे टाकून ते उकळून घ्यावं. ते कोमट झाल्यानंतर गाळून त्यात एक चमचा मध टाकून ते पिल्यास लगेच आराम पडतो.

महत्वाच्या बातम्या –