‘स्ट्रेस’वर रामबाण उपाय

आताच्या धावपळीच्या युगात आणि सतत बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट माणसाच्या आयुष्यावर होत असतो. व्यस्त वेळापत्रकामुळे तणाव, थकवा जाणवतो. परिणामी या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाला ‘स्ट्रेस’ येतो. असे म्हणतात की. स्वादिष्ट भोजनामुळे तणाव कमी होतो.

– अल्कोहोल : मद्यसेवन केल्याने विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते. त्याच्या सेवनाने अॅड्रेनलाईन हार्मोन निर्माण होतात आणि स्ट्रेस वाढतो.

रात्री केस धुवत असाल तर सावधान

– फास्ट फूड : जंक फूडमध्ये प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असते. जर तुम्हाला स्ट्रेस असेल, तर असे पदार्थ खाणे टाळावे.

– मीठ : जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मिठाचे सेवन करत असला, तर तुमच्यासाठी ते घातक ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो, तसेच उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होऊ शकते.

– चहा : चहा प्यायल्याने थकवा दूर होतो. पण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्याने झोप येत नाही. ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे स्ट्रेस आल्यावर त्याला दूरच ठेवले पाहिजे.

आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक

– गोड : स्ट्रेसमध्ये व्यक्तीची शुगर आधीच वाढलेली असते. अशा परिस्थिती जर तुम्ही अधिक गोड पदार्थ खाल्ले, तर स्ट्रेस अधिक वाढतो. त्यामुळे चिडचिडेपणा अधिक होऊ लागतो आणि तुमचे कशातही लक्ष लागत नाही.