Honda Electric Bike | होंडाची ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स

Honda Electric Bike | होंडाची 'ही' जबरदस्त इलेक्ट्रिक बाइक लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स

Honda Electric Bike | टीम महाराष्ट्र देशा: दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) वळत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक सेगमेंटवर अधिक लक्ष देत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी होंडा (Honda) ने आपली इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) सादर केली आहे. कंपनीने नुकतीच या बाइकचे स्केच जारी केले आहे.

डिझाइन

होंडाने सादर केलेल्या या इलेक्ट्रिक बाइकची डिझाइन CB750 Hornet या गाडी सारखी असेल. यामध्ये हाय परफॉर्मन्स LED लाईटसह मस्क्युलर टँक, मोठे हँडलबार, स्प्लिट-टाइप सीट्स, अँगुलर हेडलाइट, स्लिम टेल सेक्शन इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो.

फीचर्स

होंडाने सादर केलेल्या या इलेक्ट्रिक बाइकमध्ये पुढच्या आणि मागच्या चाकांना ड्युअल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असू शकते. त्याचबरोबर यामध्ये रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम आणि राइडिंग मोड्स सोबत सेफ्टी नेट अटॅच करून दिली जाऊ शकतो. या गाडीच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले, तर या बाइकमध्ये पुढच्या बाजूला इन्व्हर्टेड फोर्स आणि मागच्या बाजूला मोनो-शॉक युनिट दिले जाऊ शकते.

पॉवर रेंज

होंडाने सादर केलेल्या या नवीन इलेक्ट्रिक बाइकच्या पॉवर रेंजबद्दल अद्याप कुठली अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण अंदाजानुसार, या इलेक्ट्रिक बाइकमध्ये पीएमएस इलेक्ट्रिक मोटरसह फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान मिळू शकते. ही बाईक एका चार्जवर 200 किमी पर्यंत जाऊ शकेल.

किंमत

कंपनीकडून या बाईच्या किमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. होंडाची ही इलेक्ट्रिक बाइक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या ओबेन रोअर, जॉय ई-बाईक मॉन्स्टर, रिव्हॉल्ट RV400, कोमाकी रेंजर या गाड्यांना टक्कर देऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या