मध आणि मनुके आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.
  • मनुके आणि मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.
  • मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.
  • मनुके तसेच मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. यात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.
  • मध आणि मनुक्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. या दोन्हीमध्ये फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे महिलांना गरोदरपणात फायदा होतो.

महत्वाच्या बातम्या –