नानांच्या जागी ‘हाऊसफुल्ल ४’ मध्ये दिसणार ‘हा’ अभिनेता

तनुश्री दत्ताने गैरवर्तनाचा आरोपानंतर दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपणहून ‘हाऊसफुल्ल 4’ हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. नानांच्या जागी प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.

अनिल कपूर आणि संजय दत्त या दोघांपैकी एकाची या व्यक्तिरेखेसाठी निवड होण्याची शक्यता आहे. मात्र संजय दत्त इतर चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे अनिल कपूरच ही भूमिका साकारण्याची शक्यता अधिक आहे. नाना आणि अनिल यांनी यापूर्वी ‘वेलकम’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर निर्माण झालेल्या वादाचा फटका सिनेमाला बसू नये यासाठी नाना पाटेकर यांनी सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं मुलगा मल्हार पाटेकरने स्पष्ट केलं होतं.