सरकारला आणखी किती हवेत धर्मा पाटील?

मुंबई : शेतकऱ्यांचा जीव येवढा स्वस्त झाला का ? मंत्रालयाच्या दारात विष पिल्यावारच शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? अशे अनके प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. काहीदिवसांपूर्वी न्याय मिळावा म्हणून धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याने मंत्रालयात आत्महत्या केली होती. आता पुन्हा एक धर्मा पाटील मंत्रालयाच्या दारात आले आहेत.

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन औष्णिक वीज प्रकल्पामध्ये गेली. त्यांनी या जमिनीसाठी ४ लाख रुपये मोबदला देण्यात आला. परंतु, त्यांच्या शेतातील आंब्या झाडांचे मूल्यमापन किंवा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतीला अधिक मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. आता पुन्हा धर्मा पाटील सारखी व्यथा असणारे राजाराम गायकवाड मंत्रालयाच्या दारात आले आहेत.

आणखी एक शेतकरी न्याय मिळावा म्हणून मंत्रालयाच्या दारात आला आहे. यावरून सरकारचा भोंगळ कारभार समोर येतो. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरमकुंडी गावातल्या राजाराम गायकवाड या शेतकऱ्याचे राहते घर व अर्धा एकर शेती हायवेत गेलं. दलालांनी त्यांच्यावर दमदाटी सुरू केलीय. सरकारी यंत्रणांनी राजाराम गायकवाड यांना कुठलीही मदत केली नाही म्हणून राजाराम गायकवाडानीं थेट मंत्रालयात घाठ्ले आहे. मात्र मंत्रालयात मदत सोडून मुख्यमंत्र्यांना अर्ज द्या,विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावर जा… अशे उपदेश राजाराम गायकवाड यांना देण्यात आले. धर्मा पाटील,राजाराम गायकवाड यांचासारखे असंख्य शेतकरी महाराष्ट्रात आहेत. राजाराम गायकवाड प्रकरणावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रशासकीय यंत्रणेला फोन केला.