HPCL Recruitment | टीम कृषीनामा: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्ही आजच या पदांसाठी अर्ज करू शकतात.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (HPCL Recruitment) तब्बल 60 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन, असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर, असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
HPCL यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://hpcl.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार http://hpcl.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या