‘हम दो हमारे दो’ मोदी सरकारचे मोठे पाऊल, लवकरच कायदा लागू होणार!

मोदी सरकार

भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारताच्या लोकसंख्येचा विचार करता केंद्र सरकारने(Central Government) महत्वाचा निर्णय(Decision) घेतला आहे.

लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री(Union Minister) प्रल्हाद सिहं पटेल यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. यामुळे लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मागच्या खूप दिवसांपासून लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा(Law) आणण्याची मागणी केली जात आहे. चीन तज्ज्ञांच्या मते, २०२७ पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली होती. यामुळे आता सगळीकडे याची चर्चा सुरु आहे. राज ठाकरेंच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या मागणीला रामदास आठवले यांनी पाठिंबा(Support) दिला होता. ‘हम दो हमारे दो’ शी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार(Central Government) याबाबत निर्णय घेऊ शकतं.

मोदी सरकार(Modi government) लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा(Population Control Act) लागू करणार असल्याचे देखील केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिहं पटेल यांनी सांगितले आहे. मोदी सरकार २०१४ पासून सत्तेत आलेले आहे. मोदी सरकार सत्तेत असल्यापासून हा निर्णय घेण्याची मागणी केली जात होती.

महत्वाच्या बातम्या –