मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्‍न शासनाकडे पोचवणार – राज्यपाल कोश्यारी

राज्यपाल कोश्यारी

नाशिक – कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. त्यामध्येही त्याने स्वतःला सावरून पीक घेतले. लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरी बसून होते मात्र शेतकरी एकटा काम करत होता. तसेच त्याच्यावर संकट ही येताच असतात. आता तर कांद्यावर निर्यातबंदी आणली आहे .कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यातबंदी मागे घेणे आवश्यक आहे.

तसेच गुरुवारी शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा निर्यातबंदी रद्द होण्याबाबत व केंद्र शासनाच्या नवीन विधेयकाच्या त्रुटींबाबत राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेतली. त्यावेळी भगतसिंग कोश्‍यारी म्हणाले की, ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा निर्यातबंदी संदर्भातील शेतकऱ्यांच्या भावना व त्यांच्या अडचणी, मी केंद्र आणि राज्य शासनाकडे पोहचविणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी निश्चित मांडल्या जातील,’’ असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी राज्यपालांच्या सकारात्मक प्रतिसादाने शेतकरी संघर्ष संघटनेचे समाधान झाले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली.

तसेच लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या लक्षात आणून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच निर्यातबंदी रद्द झाली पाहिजे. शेतकरी विधेयकात शेतकऱ्याला संरक्षण न मिळाल्यास राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –