तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही – जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे.

समाजसेवक

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले कीं ह्या राज्यात मला जगायची इच्छा नसून, असे सरकारला कळवले होते.

अहमदनगर – किराणा दुकानात वाईन विक्री(Wine sales)विरोधात घेण्यात आलेला निर्णय(Decision) त्यांनतर झालेला विरोध आपण सर्वानी पहिला त्यातच अण्णा हजारे ह्यांनी बेमुदत उपोषण(Indefinite fasting) १४ फेब्रुवारीपासून करू असा सरकारला इशारा दिला होता. हा निर्णय ग्रामसभा घेऊन घेण्यात येणार होता.

अण्णा हजारे राळेगण सिद्धी (अहमदनगर) मध्ये माध्यमांशी(Media) बोलताना म्हणाले कि ‘दारूच्या दुकानात जर वाईन मिळते तर तुम्ही सुपरमार्केट / किरणा दुकानांमध्ये का विकण्यास आग्रही आहेत असा सवाल हि उपस्थित केला होता.त्यातच अण्णा म्हणाले मार्केट मध्ये आधीच एवढे दारूचे दुकान झाले आहे त्यात तुम्ही किराणा दुकानात विक्री करण्याचा निर्णय घेता. तुम्हाला सर्व जनतेला व्यसनाधीन बनवायचे आहे का ? असे आण्णा म्हणाले. तसेच सरकारला हेच हवे आहे कि लोकांना व्यसनाधीन बनवावे जेणेकरून त्यांना जे साधायचा ते साधता येईल.

अण्णांच्या उपोषण झाले रद्द…
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी वयाचा विचार करून उपोषणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थ करत होते, ती मागणी अण्णांनी मान्य करत उपोषणाला न बसण्याचा निर्णय घेतला आहे आणि म्हणाले अश्या प्रकारात वाईन खुल्या बाजारात का आणता मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही.
तसेच अण्णा म्हणाले वाईन हि काय आपली संस्कृती आहे का ? आयुष्य बरबाद करण्यास निघालेत तुम्ही म्हणून मला जगण्याची इच्छा होत नाही.

महत्वाच्या बातम्या –