संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो- खासदार रक्षा खडसे

खासदार रक्षा खडसे

संसदेत मी आणि खा. प्रितम मुंडे सहज हसलो होतो. त्याचा खा. डॉ. भारती पवार यांच्या बोलण्याशी काही संबंध नव्हता. देशातील अनेक महत्वपूर्ण विषयावर आम्ही चर्चा करतो, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आम्ही सहज हसलो म्हणून हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ त्याचे भांडवल करीत आहेत. खासदार भारतीताई पवार बोलल्या म्हणून आम्ही हसलो असे मुळीच नाही, उलट त्यांना पाठींबा देण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. असे मत खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

लोकसभेत चर्चेच्या वेळी खासदार डॉ. भारती पवार मराठीतून भाषण करीत असतांना खासदार प्रितम मुंडे व खासदार रक्षा खडसे हसत असल्याचा व्हीडीयो मोबाईलवर व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या कि, संसदेत महाराष्ट्राचे खासदार बोलत असल्यास त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थाबंतो, त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत कामकाज सुरू होते.

खासदार भारती पवार भाषण करीत असल्यामुळे त्यांना पाठींबा देण्यासाठी आम्ही थांबलो होतो. त्यांचे भाषण सुरू असतांना अगदी शेवटच्या क्षणी आम्ही सहजच हसलो, आणि संसदेत थोडेफार हसणे सुरूच असते.

महत्वाच्या बातम्या –

‘धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे’

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार

वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या शेतात नवनीत कौर यांनी केली पेरणी

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.