मी राज्यातील जनतेसाठी केंद्र सरकारच्या पाय पडतो, हात जोडतो, आता तरी मदत करा – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. केंद्राने केवळ २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्‍शन देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र  महाराष्ट्राला  ३६ हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. मी राज्यातील जनतेसाठी केंद्राच्या पाय पडतो, हात जोडतो.आता तरी मदत करा, अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला आज साकडे घातले.

“राज्य सराकर सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे असे टोपे म्हणाले आहेत.

ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे सध्या आपल्याकडे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत आहोत”, असं देखील ते म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्रसरकारने नुकताच आपल्या देशातील विविध राज्यांना वाटप केलेला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या डाटा जाहीर केला असून त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या डाटामध्ये राज्याला फक्त २६ हजार इंजेक्शन्स देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.

रेमडेसिवीरची दररोज महाराष्ट्र मधील मागणी 50000 ची मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33000 ते 36000 पुरवते आहे आता केंद्र सरकारनी ताब्यात घेतले आत्ता महाराष्ट्राला मिळणार 26000. महाराष्ट्राचा असा छळ कश्या साठी ? असा सवाल उपस्थीत करत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –