पक्ष निर्णयामुळे मी खुप दुखावलो गेलो – सदाभाऊ खोत

अक्षय पोकळे :- एकाच ताटात बसून घास खाणारे दोन नेते आज मात्र वेगळे झाले आहेत. सदाभाऊ खोत यांच्यावर पक्षशिस्त न पाळल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले होते. यासाठी नेमण्यात आलेल्या ४ सदस्यीय चौकशी समितीची आज पुण्यात महत्त्वाची बैठक झाली. यावेळी त्यांच्या कामाबद्दलच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचा निर्णय चौकशी समिती अध्यक्ष दशरथ सावंत यांनी केला. चौकशी समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली.
सदाभाऊंनी आजवर केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर मध्यतंरी झालेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशी समितीसमोर शेतका-यांच्या बाजूने भूमिका मांडण्यापेक्षा सदाभाऊंनी आज केवळ सरकारची भूमिका मांडल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदाभाऊंवरील कारवाईची माहिती पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना देण्यात आली असून त्यांना हा निर्णय मान्य असल्याचेही समजतय.
संघटनेविरोधी भूमिका घेतल्याचा सदाभाऊंवर ठपका ठेवण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून खोत आणि शेट्टी यांच्यात उडालेल्या खटक्यांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतीच. त्यावर आज सदाभाऊंची हकालपट्टी होणार का आणि सदाभाऊ नेमका कोणता निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

लहानपनापासून चळवळीत काम केले आहे. कोणत्याही स्वार्थी आणि लाचारी साठी काम केले नाही. शेतकऱ्यांच्या प्रशनावर कायमच आवाज उठवला आहे. शेतकरयांसाठी वेळ प्रसंगी लाठया ही झेल्या आहेत. तरी सुद्धा आज पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घेतला आहे तो भला मान्य आहे. पन या निर्णयामुळे मी खुप दुखावलो गेलो आहे. मंत्री पद सोडायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. दूसरा पक्ष काढायचा यावर कोणताही विचार सध्या नाही. महिलेने केलेली आरोप व ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्यावर आता बोलन योग्य ठरनार नाही.
सदाभाऊ खोत ,कृषि राज्यमंत्री

सदाभाऊ हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून मंत्रीपदावर आहेत. तेव्हा त्यांच्या मंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच सरकारमध्ये राहण्याच्या निर्णयाबाबत आठवडाभरात कार्यकारणीची बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी
प्रकाश फोफळे, प्रदेशाध्यक्ष (स्वाभिमानी संघटनेचे )

सदाभाऊ मंत्री पद सोडनार का..?
आज चौकशी समितीने सदभाऊंना पक्षातुन काढून टाकल्याची घोषणा केल्यानंतर मंत्रीपदी सदाभाऊ राहणार का ही चर्चा सुरू झाली आहे. स्वाभिमानी मुळे मिळालेल मंत्री पद सोडावं अस आवाहन स्वाभिमानी कडून करण्यात आलं आहे. माझ्या मंत्रपदाची निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा पक्ष घेईल अशी सावध प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली